एस.के.24 तास
मुंबई : मुंबई विक्रोळी पार्क साईट येथील वर्षा नगरमधील जनकल्याण सोसायटीजवळ आज पहाटे भूस्खलनाची घटना घडली. ही घटना 16 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 02 39 मिनिट वाजता घडल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेत एका झोपडीवर टेकडीवरून माती आणि दगडांचा ढिगारा कोसळला. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच तात्काळ मुंबई अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक वॉर्ड कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. या घटनेत चार जण जखमी झाले होते, त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दुर्घटनेतील मृतांची आणि जखमींची नावे
- मृतक : -
- शालू मिश्रा वय,19 वर्ष महिला)
- मृत- सुरेश मिश्रा वय,50 वर्ष पुरुष)
- जखमी : -
- आरती मिश्रा वय,45 वर्ष महिला
- ऋतुराज मिश्रा वय,20, वर्ष पुरुष
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा भाग भूस्खलनासाठी संवेदनशील असून, ही जमीन कलेक्टर यांच्या मालकीची आहे. या घटनेमुळे प्रशासनावर योग्य उपाययोजना करण्यासाठी दबाव वाढत आहे.