सावित्रीबाई महिला प्रबोधन बचत गटाद्वारे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी येथील सावित्रीबाई महिला प्रबोधन बचत गटा द्वारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.सविता धाकट यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून माल्यार्पण केले.प्रमुख मार्गदर्शिका सौ.प्रीती नंदेश्वर,सौ.प्रीती रामटेके,सौ.मोटघरे मॅडम यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन कार्याविषयी तसेच बौद्ध धर्मातील वर्षावास विषयी मार्गदर्शन केले .
या कार्यक्रमाला बचत गटातील बहुसंख्य महिला उपस्थित राहुन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.