वांद्रा ग्राम पंचायत ला आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार प्रदान.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी -१५/०८/२५ ब्रम्हपुरी तालुक्यातील ग्राम पंचायत वांद्रा गावाला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत आर.आर.(आबा) पाटील सुंदर गांव पुरस्कार योजने अंतर्गत जिल्हा स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत निर्धारीत निकषात चंद्रपूर जिल्ह्यातून सर्वाधिक गुण प्राप्त करून मानाचा तुरा रोऊन घेतला.
ग्रामपंचायत वांद्रा ला आजाच्या मंगलमय स्वातंत्र दिनी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.ना.अशोक ऊईके यांचे शुभहस्ते चंद्रपूर चे खासदार प्रतिभाताई धानोरकर,शिक्षक आमदार सुधाकर अडबाले ,चंद्रपूर विधानसभा आमदार किशोर जोरगेवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे गौरविण्यात आले आहे.
त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात व वांद्रा गावात उत्साहाचे वातावरण तयार झाले असून नागरिकांनी आजचा स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदात साजरा केला आहे.