भामरागड ला पुराचा वेढा पुरामधून गर्भवतीला बोटीद्वारे न्यावे लागले रुग्णालयात ; शंभरवर गावांचा तुटला.

भामरागड ला पुराचा वेढा पुरामधून गर्भवतीला बोटीद्वारे न्यावे लागले रुग्णालयात ; शंभरवर गावांचा तुटला.


एस.के.24 तास

भामरागड : लगतच्या छत्तीसगड राज्यात झालेल्या मुसळधार पावसाचा भामरागडला पुन्हा एकदा फटका बसला आहे. २७ ऑगस्टला पहाटे संपूर्ण शहराला पुराने वेढा टाकला. या दरम्यान एका गर्भवतीला बोटीच्या सहाय्याने पुरातून बाहेर काढून दवाखान्यात हलविण्यात आले.

छत्तीसगडमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे भामरागडजवळून वाहणाऱ्या पर्लकोटा,इंद्रावती आणि पामुलगौतम या नद्यांना पूर आला. पहाटे पुराचे पाणी शहरातील मुख्य बाजारपेठेत शिरले.त्यामुळे ४० हून अधिक दुकानांमधील साहित्याचे नुकसान झाले. शहराला अक्षरशा: नदीचे स्वरुप आले होते. 

त्यामुळे गणेश आगमनाच्या दिवशी नागरिकांची अक्षरश: त्रेधा उडाली. राज्य राखीव दलाच्या पथकाने पहाटे ४ वाजता हिंदेवाडा येथे अर्चना विकास तिम्मा या गर्भवतीस प्रसववेदने सुरु झाल्या.

 पण संपूर्ण गावाला पुराचा वेढा पडला होता.याबाबत माहिती होताच तहसीलदार किशोर बागडे यांनी तातडीने पामुलगौतम नदीच्या पुरातून बोटीच्या सहाय्याने तिला सुरक्षितपणे बाहेर काढून भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.


शंभरवर गावांचा तुटला संपर्क : - 


पर्लकोटावरील जुना पूल पाण्याखाली गेल्याने पुन्हा एकदा भामरागड तालुका मुख्यालयासह परिसरातील शंभरहून अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. या पावसाळ्यात पुरामुळे भामरागडचा संपर्क तुटण्याची ही चौथी वेळ आहे.नव्या पुलाचे काम न्यायालयीन प्रक्रियेत खोळंबले आहे. त्यामुळे दरवर्षी पूरस्थितीत भामरागडवासीयांचे हाल होतात.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !