गडचिरोली शहरातील फुले वॉर्ड मधील अंडरग्राउंड पाईपलाईन चे पाणी बाथरूम व नळाच्या टाक्यात शिरले वॉर्डातील नागरिक त्रस्त.

गडचिरोली शहरातील फुले वॉर्ड मधील अंडरग्राउंड पाईपलाईन चे पाणी बाथरूम व नळाच्या टाक्यात शिरले वॉर्डातील नागरिक त्रस्त.


एस.के.24 तास


गडचिरोली : दिनांक,18/08/2025 सोमवार ला दुपार पासून  सुरु असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून,अनेक भागांत पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.गडचिरोली शहरात रात्रभरात तब्बल १७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.


अश्यातच उन्हाळ्यामध्ये गडचिरोली शहरातील फुले वॉर्ड मधील आशीर्वाद मंगल कार्यालय पासून ते माता मंदिर पर्यंत अंडरग्राउंड पाईपलाईन चे काम करण्यात आले. आणि घरातील बाथरूम चे पाणी पाईप लाईन द्वारे जावे म्हणून पाईप लावण्यात आले.आशीर्वाद मंगल कार्यालय पासून येणारा पाणी पूर्ण फुल येत असल्याने हरिदास वंजारी,वेदमनी खोब्रागडे,ताराबाई मुरमाडकर,राजू बारसिंगे,भूमिका बारसिंगे,मिनाबाई बारसागडे,बाथरूम व नळाच्या टाक्यात शिरले.


शहरातील वॉर्डात गेल्या दोन दिवसांपासून अंडरग्राउंड पाईपलाईनमध्ये गळती झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.घरातील बाथरूममध्ये पाईपलाईनचे पाणी येत असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळा निर्माण झाला आहे.


या गळतीमुळे पाण्याचा अपव्यय तर होतच आहे, शिवाय घरात घाण पाणी साचल्याने आरोग्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे.लहान मुले व वृद्धांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.नागरिकांनी नगरपरिषदेकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही दखल घेतली नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे संतप्त फुले वॉर्डातील नागरिकांनी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून पाईपलाईन दुरुस्त करावी,अशी मागणी केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !