अंतुर्ला येथे मोफत (HB) हिमोग्लोबीन तपासणी शिबिर यशस्वीपणे पार पडले.
एस.के.24 तास
ग्रामीण भागातील किशोरवयीन मुली व महिलांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती निर्माण व्हावी, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष वेधले जावे तसेच हिमोग्लोबीनच्या कमतरतेसारख्या गंभीर समस्यांची वेळेत तपासणी होऊन निदान करता यावे, या मुख्य उद्देशाने धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि पहेल मल्टीपर्पज सोसायटी, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हिमोग्लोबीन (HB) तपासणी शिबिराचे आयोजन अंतुर्ला येथे करण्यात आले.
हा उपक्रम धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चरचे मुख्य महाप्रबंधक मा.श्री.देवेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. शिबिरात मुख्य व्यवस्थापक डॉ. अनिश नायर, उपसरपंच सौ. अनिता जोगी, माजी सरपंच सौ. आवडती फुलझेले, आशावर्कर सौ. अनिता माशीरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या शिबिरात एकूण ५० किशोरवयीन मुली व महिलांची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान ज्या महिलांचे व मुलींचे हिमोग्लोबीन स्तर कमी असल्याचे निदान झाले, त्यांना त्वरित औषधोपचारासाठी लोह (Iron) गोळ्या वाटप करण्यात आल्या.
गावात आरोग्यविषयक सुविधा कमी असताना, असे शिबिर ग्रामीण महिलांसाठी एक मोठा दिलासा ठरतो.हिमोग्लोबीनची कमतरता ही महिलांमध्ये सामान्य असूनही दुर्लक्षित राहते. त्यामुळे या शिबिरामुळे वेळेत निदान होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणे शक्य झाले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी दिनेश कामतवार,सपना येरगुडे,ज्योती तुराणकर, सेजल चांदेकर तसेच गाव विकास ग्रूप यांनी विशेष मेहनत घेतली.त्यांच्यामुळेच उपक्रम नीट नियोजनपूर्वक आणि प्रभावीपणे पार पडला.
अशा प्रकारचे आरोग्य शिबिर ग्रामीण भागात वारंवार राबविले जावेत,अशी ग्रामस्थांची अपेक्षा असून भविष्यातही धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर व पहेल मल्टीपर्पज सोसायटीकडून आरोग्यविषयक उपक्रम राबविल्या जाणार आहे.