गडचिरोली MIM पक्षाचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न.
📍स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पूर्ण ताकतीने लढवा. - निसार अहमद सिद्दिकी
एस.के.24 तास
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील MIM पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मेळावा पत्रकार भवन येथे उत्साहात संपन्न झाला कार्यकर्ता मेळावा मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर प्रभारी निसार अहमद सिद्दिकी, आणि शाहिद भाई रंगूनवाला यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.
निसार अहमद सिद्दिकी यांनी MIM पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना संबोधित करताना सांगीतले की MIM पक्ष हा गोर,गरीब, शोषित, पिढीत लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करतो प्रत्येक समाजाच्या लोकांना सोबत घेऊन जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करत आहेत.येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पूर्ण ताकतीने लढवा असे आवाहन पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना दिले.
गडचिरोली जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत MIM पक्षाला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी निर्णय घेण्यासाठी पूर्ण ताकतीने जिल्हा अध्यक्ष बाशिद शेख,महिला जिल्हा अध्यक्ष आयशा अली सय्यद, जिल्हा सचिव सिद्दिक मन्सूरी,गोरक्षक दलाचे जिल्हा अध्यक्ष तौफिक सय्यद, जिल्हा उपाध्यक्ष विपिन सूर्यवंशी,
युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष दिलीप बांबोळे, सोशल मीडिया प्रमुख जावेद शेख, शहर अध्यक्ष स्वप्निल साळवे, युवा नेते रमजान शेख, शाहरुख शेख,अनिल संतोषवार, मुन्ना रामटेके,महिला कार्याध्यक्षा शगुप्ता शेख, उज्वला क्षिरसाठ, किरण सहारे, वर्षाताई खंडागळे, सरीता बावणे,स्मिताताई संतोषवार,यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण ताकतीने निवडणूक लढवा असे आवाहन केले.
यावेळी MIM पक्षाचे युवा नेते महबूब मलिक, इरफान सैफी, तेजराम नेतनकर, मुस्ताक सय्यद,करणं मोहुर्ले, प्रितम मेश्राम, यश सरोदे, वासुदेव मडावी, विलास बावणे, कोमल राजपूत,रेहान शेख, सलाम शेख, आदि उपस्थित होते.