एस.के.24 तास
गडचिरोली - बोधीवृक्ष सेमाना रोड येथे ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुळशिराम सहारे माजी सभापती न.परिषद गडचिरोली हे होते.प्रमुख मार्गदर्शक केशव भालेराव विधानसभा अध्यक्ष बसपा,चंद्रशेखर भडांगे भ्रष्टाचार निर्मूलन समिती,कवडू खोब्रागडे,नामदेव दुधे,भगवान राऊत, सुनिल उराडे हे होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तुळशिराम सहारे म्हणाले की,बुद्ध धम्म हा स्वातंत्र्य,समता,बंधुता व न्याय देणारा आहे . त्यामुळे सर्वांनी धम्माचा स्विकार करावे . पंचशिल झेंडाचे ध्वजारोहन निलीमा दुधे यांनी केले.नंतर त्रिशरण व पंचशिल ग्रहण करण्यात आले . मंचावर उपस्थितांनी धम्मावर प्रबोधन केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रमोद राऊत,प्रास्ताविक भगवान राऊत यांनी केले तर आभार नामदेव दुधे यांनी मानले.या कार्यक्रमाला दिवाकर सहारे,संघरक्षित फुलझेले,कामराज चांदेकर, ॲड.शांताराम उंदिरवाडे,वैभव नांदगावे,जितेंद्र दुधे,खुशाल तरोणे,अंबादास उंदिरवाडे,मिलींद भसारकर,विजय मेश्राम,अशोक खोब्रागडे
देवानंद फुलझेले,प्रविण धुरके,उषा लोणारे,लता बोदेले,माधूरी बांबोळे,सुरेखा मेश्राम, मिनाक्षी वासनिक, प्रेमिला अलोणे,कांता भडके,वर्षा राऊत,अर्चना राऊत, शिला करमरकर,दिलीप रायपूरे,सुनंदा उराडे,धनराज ठेमस्कर,हसरला जनबंधू आदि उपासक उपासिका उपस्थित होते.