सायबर क्राईम अवरनेस विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन,ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन चा उपक्रम.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक ३०ऑक्टोंबर २०२५ ला सायबर क्राईम अवरनेस निमित्य पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी च्या वतीने पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले साहेब पोलीस स्टेशन,ब्रम्हपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अरुण पिसे,पोलिस अंमलदार देवेंद्र लोणबले पोलीस स्टेशन,ब्रम्हपुरी यांनी रिलायबल अकॅडमी ऑफ कोटा शाखा, ब्रम्हपुरी येथे जाऊन सायबर गुन्हे अवरनेस गुन्ह्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
तसेच सायबर गुन्ह्याच्या संबंधात , पोस्को कायद्याविषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला जवळपास १०० विद्यार्थी हजर होते.कार्यक्रमाप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य रामटेके सर व इतर सहकारी शिक्षक हजर होते.


