ने.हि.महाविद्यालयाची उत्तुंग भरारी २६ विद्यार्थी गोंडवाना विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत.


ने.हि.महाविद्यालयाची उत्तुंग भरारी २६ विद्यार्थी गोंडवाना विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक.


ब्रम्हपुरी : दिनांक,०७/१०/२५ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा राखीत गोंडवाना विद्यापीठाने सत्र २०२४-२५ या शैक्षणिक सत्रातील घोषित केलेल्या गुणवत्ता यादीत नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील २६ विद्यार्थ्यांनी आपले यशाचे शिखर पादाक्रांत करीत नाव कोरले आहे.


यात अंबिका मांढरे ( बी.ए.८ वे मेरिट),किरण नाकतोडे ( बी.ए.भूगोलमध्ये प्रथम मेरिट),वैष्णवी थेरकर ( बी. काॅम प्रथम मेरिट),दीपा बोरकुटे( बी.काॅम तिसरे मेरिट),गौरव भोयर ( बी.काॅम चवथे मेरिट),रोहित गोंगल (बी. Lकाॅम ५ वे मेरिट),सोनी शेंडे ( एम.ए इंग्लिश ३ रे मेरिट),साईनाथ मस्के (एम.ए इंग्लिश ५वे मेरिट),फरनाज पठाण ( एम.ए मराठी प्रथम मेरिट),स्नेहा बनपुरकर (एम.ए मराठी २ रे मेरिट),पियूष बहेकर (एम.ए मराठी ३रे मेरिट),अर्शिया शेख ( एम.ए समाजशास्त्र प्रथम मेरिट),कृष्णा दास ( एम ए भूगोल प्रथम मेरिट), डेव्हिड राऊत ( एम.ए भूगोल २रे मेरिट),आचल मेश्राम (एम.ए भूगोल ३रे मेरिट), अश्विनी कुरेकर ( एम.ए इतिहास ५वे मेरिट),निकेश कुळे (एम.ए राज्यशास्त्र ३ रे मेरिट)


सुशांत मेश्राम ( एम.काॅम ३ रे मेरिट),अनम धमाणी ( एम एस स्सी कम्प्युटर प्रथम मेरिट),शितल रामटेके ( एम एस स्सी बाॅटनी २रे मेरिट),भाग्यश्री भाकरे ( एम एस स्सी फिजिक्स ४थे मेरिट),सुहासिनी डोर्लीकर ( एम एस स्सी केमेस्ट्री २रे मेरिट),निकेश ठाकरे (एम एस स्सी केमेस्ट्री ३रे मेरिट),स्नेहल तुपट ( बी लीप ३रे मेरिट), अंकिता मदनकर ( एम.लिप प्रथम मेरिट),निकिता पिलारे (एम.लिप २रे मेरिट) या २६ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या इतिहासात मानाचा तुरा रोवला असून संस्थेचे सचिव अशोक भैयांची दूरदृष्टी, उद्यावत शिक्षणव्यवथा व महाविद्यालयातील नियमित वर्ग,तज्ज्ञ प्राध्यापक यामुळे हे घवघवीत यश प्राप्त झाल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी बोलून दाखविले.

  

या गुणवत्ता यादीत आलेल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचा संस्थेच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला असून नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीमती स्नेहलताताई भैया, उपाध्यक्ष अँड प्रकाश भैया, सचिव अशोक भैया,सदस्य गौरव भैया, प्राचार्य डॉ सुभाष शेकोकर,समस्त प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी संपूर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले असून त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !