सिद्धार्थ युवा फेडरेशन बौद्ध समाज मंडळ केरोडा येथे संविधान दिनाचा कार्यक्रम संपन्न.
📍संविधानच देशव्यापियांचा ग्रंथ. - ॲड. राम मेश्राम.
एस.के.24 तास
गडचिरोली- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी साकारलेले संविधान भारत देशवासीयांसाठी सर्वतुल्य असुन संविधानातील अधिकारामुळेच भारतिय नागरिकांचा विकास होवू शकतो. त्यामुळे भारतिय संविधान प्रत्येक नागरिकांच्या घरात ठेवून त्याचे वाचन करावे व ओबिसी बांधवांनी संविधान समजून घेण्याची आज गरज आहे अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन माजी जि.प.सदस्य ॲड. राम मेश्राम यांनी केरोडा येथील संविधान दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी केले.
सिद्धार्थ युवा फेडरेशन बौद्ध समाज मंडळ केरोडा येथे संविधान दिनाचा कार्यक्रम कांग्रेसचे नेते माजी सभापती दिनेश चिटनुरवार हे अध्यक्षस्थानी होते.तर कार्यक्रमाचे उदघाटक ॲड.राम मेश्राम हे लाभले होते.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन आर.पि.आय.चे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर,आर.पि.आय.चे नेते गोपाल रायपुरे
कांग्रेस चे तालुका अध्यक्ष नितिन गोहणे,सरपंच्या नर्मदाताई चलाख केरोडा,उपसरपंचओमप्रकाश ढोलणे,रिपाईचे तालुकाध्यक्ष किशोर उंदिरवाडे,प्रकाश ढोलणे,चेतन रामटेके प्रज्ञाताई ढोलणे,चक्रपाणी निमगडे,हंसदास साखरे,प्रितम गेडाम,विनोद सहारे मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी प्रा.मुनिश्वर बोरकर म्हणाले की गावागावातील उद्भणाऱ्या समस्या सोडविण्याचे काम कांग्रेस - रिपाई कडूनच होत असतात तर अध्यक्षस्थानावरून दिनेश चिटनुरवार म्हणाले की संविधान दिनाच्या कार्यक्रमासाठी केरोडा गावातील नागरिक एकजुटीने कार्यक्रम घेतात व खऱ्या अर्थाने जातीयता नष्ट करून एकोपा निर्माण करून चांगले कार्य करण्याचे काम होत आहे असे आपल्या भाषणातून मत व्यक्त केले.
आभार शैलेश ढोलणे यांनी मानले संविधान दिनाच्या निमित्याने गायक फैज्जान ताज यांचा भिमगिताचा प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडला कार्यक्रमास केरोडा परिसरातील असंख्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.


