महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव येथे भगवान बिरसा मुंडा जयंती जनजाती गौरव दिन म्हणून साजरा.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१५/११/२५ ब्रम्हपुरी तालुक्यातील महाराष्ट्र विद्यालय पिंपळगांव( भो) येथे आज भगवान बिरसा मुंडा जयंती दिन हा जनजाती गौरव दिन म्हणून साजरा करण्यातआला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री ओमप्रकाश बगमारे सर तर प्रमुख अतिथी श्री रुपेश पुरी सर,श्री.राजेश क- हाडे सर,श्री महाले सर
श्री घ्यार सर,श्री नाकाडे सर,श्री मेश्राम सर व शिक्षकेतर कर्मचारी होते. या दिनानिमित्त श्री सडमाके सर यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याबद्दल माहिती देण्यात आली.
तसेच या दिनानिमित्त या सत्रामध्ये पार पडलेल्या हस्तकला प्रदर्शनीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यपूर्ण हाताने निरनिराळ्या वस्तू,शोभिवंत उपकरणे,अनेक प्रकारच्या भेटवस्तू तयार करून आपली हस्तकला प्रदर्शित केली. उत्कृष्ट हस्तकला तयार करणाऱ्या प्रथम,द्वितीय व तृतीय विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
तसेच प्रथम सत्र परीक्षेचा वर्ग पाच ते आठ चा निकाल जाहीर करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गावडकर सर तर आभार प्रदर्शन कुमारी अंशुल राऊत मॅडम यांनी केले.


