डॉ.आंबेडकर महाविद्यालयात " जनजाती गौरव दिन " उत्साहात साजरा.

डॉ.आंबेडकर महाविद्यालयात " जनजाती गौरव दिन " उत्साहात साजरा.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक 


ब्रम्हपुरी : दिनांक,१५/११/२५ भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात ‘जनजाती गौरव दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात येतो. या निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, ब्रम्हपुरी येथे अभिवादन व मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .

       

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे यांनी आपल्या संबोधनात बिरसा मुंडा हे केवळ आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान नसून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्वाचे आधारस्तंभ होते असे भाष्य करून आदिवासी समाजाला संघटीत करून ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्षाचा नवा अध्याय त्यांनी लिहिला असे प्रतिपादन केले. 

           

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक,इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. रुपेश मेश्राम यांनी ‘भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील दुर्लक्षित नायक – बिरसा मुंडा’ या विषयावर सविस्तर भाष्य करताना बिरसा मुंडा यांच्या जीवन आणि कार्यावर प्रकाश टाकला.  जल - जंगल–जमीन यांच्या हक्कासाठी बिरसा मुंडा यांनी पुकारलेल्या सशस्त्र लढ्यावर प्रकाश टाकला. 

          

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी,प्राध्यापकवृंद तथा शिक्षकेतर कर्मचारी बहुसंखेने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !