ग्रा.पं.कोंडेखल येथील पदाधिकारी पदाचा गैरवापर करणाऱ्यावर पं.स.सावली चे विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी गंभीर गैरव्यवहाराकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष. 📍पं.स.सावली चे विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद,चंद्रपूर यांच्या कडे सुरेश कन्नमवार यांनी केली तक्रार.

ग्रा.पं.कोंडेखल येथील पदाधिकारी पदाचा गैरवापर करणाऱ्यावर पं.स.सावली चे विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी गंभीर गैरव्यवहाराकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष. 


📍पं.स.सावली चे विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद,चंद्रपूर यांच्या कडे सुरेश कन्नमवार यांनी केली तक्रार.

      

   सुरेश कन्नमवार ! मुख्य संपादक 


सावली : तालुक्यातील ग्रामपंचायत,कोंडेखल ता. सावली जि.चंद्रपूर येथील सुरेश कन्नमवार (मुख्य संपादक एस.के.24 तास तथा सामाजिक कार्यकर्ता) यांनी दिनांक,11/07/2025 रोजी ग्रामपंचायत अधिनियम,1958 उल्लंघन करून ग्रामपंचायत पदाधिकारी पदाचा गैरवापर करून शासनाची फसवणूक केल्याबाबत तक्रार अर्ज दाखल केलेला होता.


एक महिना लोटून सुद्धा कुठल्याही प्रकारची चौकशी न करून लेखी बयान न घेता अहवाल दिले नाही. स्वतः सुरेश कन्नमवार यांनी पंचायत समिती सावली येथे प्रत्यक्ष विस्तार अधिकारी,राजू परसवार यांना माहीती विचारले असता ते प्रकरण विस्तार अधिकारी संजीव देवतळे यांच्या कडे आहे. असे सांगितले.


संजीव देवतळे यांना विचारले असता उडवा - उडवीचे उत्तर दिले.गटविकास अधिकारी,मुक्तेश्वर कोमलवार यांच्या कक्षात जावून माहीती दिली असता.दोन्ही विस्तार अधिकाऱ्यांना बोलावले असता राजू परसवार हे काम आहे.म्हणून कक्षात न येता बाहेर निघून गेले. गटविकास अधिकारी,मुक्तेश्वर कोमलवार यांनी संजीव देवतळे यांना आठ दिवसात निकाल मार्गी लावण्या चे सांगितले.परंतु दिनांक,11/07/2025 ते आजतागायत म्हणजेच दिनांक, 18/11/2025 चार महिने लोटूनही पाच वा महिना सुरु आहे.कसल्याही प्रकारची दखल अंदाजी घेण्यात आलेली नाही.


यावरून असे निदर्शनास येते की, श्री.संजीव देवतळे व राजू परसवार विस्तार अधिकारी (पंचायत) आणि श्री.मुक्तेश्वर कोमलवार गटविकास अधिकारी,पंचायत समिती सावली यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून ग्रामपंचायत मधील गंभीर गैरव्यवहराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.


ग्रामपंचायत अधिनियम,1958 च्या तरतुदीचे उल्लंघन करून ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी शासनाच्या निधीचा गैरवापर करून व शासनाची फसवणूक केल्याची तक्रार देवून सुद्धा चार ते पाच महीने संबंधित अधिकारी यांनी याबाबत योग्य चौकशी करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली आहे. त्यांच्या निष्क्रीय वर्तनामुळे शासकीय कामकाजात विलंब होत आहे.तालुक्यातील तक्रारी दोन्ही विस्तार अधिकारी हे नेहमी दुर्लक्ष करत असतात अशी तालुक्यात चर्चा आहे.नागरीकांच्या तक्रारी कडे नेहमी वारंवार दुर्लक्ष करीत असतात.


करीता यांच्या विरूद्ध दप्तर दिरंगाई शिस्तभंगाची महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम,1979 नुसार गंभीर गैरव्यवहाराकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्यामुळे पं.स.सावली चे विस्तार अधिकारी (पंचायत),श्री.संजीव देवतळे व राजू परसवार आणि श्री.मुक्तेश्वर कोमलवार गटविकास अधिकारी,पंचायत समिती सावली यांच्यावर कारवाई करण्यासाठी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद,चंद्रपूर यांच्या कडे सुरेश कन्नमवार यांनी केली तक्रार केली आहे.

 


नागरिकांनी केलेल्या तक्रारींना गांभीर्याने घेण्याऐवजी अधिकारी परस्परांकडे ढकलणे,कक्षात न येणे, टाळाटाळ करणे ही वागणूक अत्यंत गैरजबाबदार आहे.शासन निधीचा गैरवापर झाला आहे,तरीही चौकशी लांबवली जात आहे.ही सर्वस्वी दप्तर दिरंगाई असून,संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई अत्यावश्यक आहे.मी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केवळ माझ्या वैयक्तिक कारणांसाठी केलेली नाही; तर सामान्य नागरिकांना न्याय मिळावा. -  सुरेश कन्नमवार पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !