मुल तालुक्यातील गडीसुर्ला गावामध्ये महिल्या च्या पुढाकाराने अवैद्य दारू विक्रीला अखेर लगाम.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : तालुक्यातील गडीसुर्ला या गावात अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री त्रासदायक होत असल्यामुळे महिल्या वर्गाच्या व ग्रामस्थांच्या पुढाकाराने दि,१९/ ११/२०२५ रोज मंगळवारी रात्रौ ९ वाजता ग्राम सभा बोलावून गावातील महिला/ पुरुष व अवैद्य दारू विक्रेते एकत्र येउन दारूमुक्ती चा निर्णय घेण्यात आले,गडीसुर्ला गावा मध्ये अनेक वर्षांपासून अवैद्य दारूविक्री,पोलीस वाल्यांच्या आशीर्वाद मुळे जोमात चालू होती घेत होती,कित्येक वेळा पोलीस ठाण्यात तक्रार देउन सुद्धा पोलीस वाले बग्याची भूमिका घेत होती.
अवैध दारू विक्रीमुळे सर्व वयोगटातील नागरिक व्यसनाधिसना कडे झुकले होते घराघरात भांडणे तंटे ,महिला वर होणारे त्रास तशेच अनेक घरांचे संसार उदवास्त होण्यास दारू विक्री जबाबदार असल्याचे ग्रामस्थांनी सभेत नमूद केले व अखेर महिला वर्गानि ग्रामस्थांन च्या पुढाकाराने सभा घेऊन जे लोक अवैध दारू विक्री करत होते.
त्यांना बोलावून सामूहिक चर्चा केली त्यानंतर संबंधीतानी ग्राम सभेसमोर आजपासुन दारूविक्री पूर्णपणे बंद करण्याचे लिखित आस्वासण दिले,या वेळी ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत करून त्यांची सहानुभूती व्यक्त केली.
या महत्वपूर्ण बैठकीत दारूमुक्ती संघटना चे अध्यक्ष सौ, प्रतीक्षा आवळे सचिव सौ उजवला शेंडे,सौ शरदाताई येनूरकर सरपंच ग्रा.प.सौ करिष्मा वाढई उपसरपंच ग्रा.प.श्री प्रीतम आकुलवार सध्यक्ष ग्रा.प.व सर्व ग्राम प.सध्यक्ष श्री भीमराव डोरलीकर अध्यक्ष तंटामुक्ती समिती,श्री संजयभाऊ येनूरकर माजी सरपंच, श्रीमती प्रतिभा लहामंगे पोलीस पाटील,सौ मालन ताई वाळके पोलीस पाटील चुरुळ तुकुम
सखी/मैत्री ग्राम संघातील सर्व बचत गटातील महिला वर्ग,श्री गुरुदेव सेवा भजन मंडळातील सर्व सभासद,तसेच गावातील सर्व महिला/ पुरुष व युवकांनी मोठ्यासंख्येने उपस्तीत राहून दारूमुक्ती उपक्रमाला सहकार्य केले व ग्रामस्थांनी दाखविली एकजूट व महिला वर्गा चा पुढाकारा आणि सामाजिक बांधीलकी यामुळे गडीसुर्ला गावांनी दारूमुक्तीच्या दिशेने घेतलेले हे पाहुल आदर्श ठरतं आहे.


