चकमकीत 12 नक्षलवादी ठार ; 3 जवान शहीद.
एस.के.24 तास
गडचिरोली : सरकारकडून लवकरच नक्षलवाद संपवण्याचा दावा करण्यात येत असताना 3 डिसेंबर रोजी छत्तीसगडमधील बीजापूर - दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमाभागात झालेल्या चकमकीत 12 नक्षलंना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले.यात 3 जवानांनाही प्राण गमवावे लागले आहे. चकमक सुरूच असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे.
बिजापूरचे पोलीस अधीक्षक डॉ.जितेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार,बीजापूर-दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमा भागात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी घातपात घडविण्याच्या उद्देशाने एकत्र आल्याची गोपनीय माहिती यंत्रणेला मिळाली होती.त्यावरून डीआरजी,एसटीएफ (विशेष कार्य दल) आणि कोब्रा सुरक्षा दलाचे विशिष्ट कमांडो यांच्या संयुक्त पथकाने बुधवारी सकाळी 9:00.वा. पासून परिसरात शोध मोहीम सुरू केली होती.
यावेळी दबा धरून असलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला.प्रत्युत्तर दाखल जवानांनीही गोळीबार केला.3 जवान शहीद झाले.चकमकीनंतर जवानांनी परिसरात शोध घेतला असता 12 नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले.घटनास्थळावरून ‘एसएलआर’ आणि 303 बंदुकांसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
चकमकी दरम्यान मोनू वडाडी आणि आरक्षक दुकारू गोंडे या डीआरजी बीजापूरच्या दोन जवानांना वीरगती प्राप्त झाली.या व्यतिरिक्त जवान सोमदेव यादव हे जखमी झाले असून, त्यांना प्रथमोपचारानंतर पुढील उपचारांसाठी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
देशाला नक्षलमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने अवलंबलेल्या धोरणांमुळे हिंसाचारात लक्षणीय घट झाली आहे.2014 ते 2024 या दशकात हिंसक घटनांची संख्या घटून 7,744 पर्यंत खाली आली आहे,जी मागील दशकापेक्षा सुमारे 53 % टक्के कमी आहे.2010 मधील सर्वाधिक हिंसक घटनांची संख्या (1,936) घटून 2024 मध्ये केवळ 374 पर्यंत आली आहे, जी 81 % टक्के इतकी आहे. नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेले जिल्हे देखील 126 वरून घटून 2015 पर्यंत 11 पर्यंत आले आहेत.
या आकडेवारीवरून स्पष्ट होते की,या हिंसाचारामुळे देशाचे झालेले जीवित आणि आर्थिक नुकसान प्रचंड मोठे असले तरी, सुरक्षा आणि विकास धोरणांमुळे या संकटावर नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे.सद्याच्या घडीला मग नक्षल संघटनेतील पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीचे केवळ 6 सदस्य शिल्लक आहेत.सक्रिय सदस्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
छत्तीसगड मधील सुकमा,बिजापूर आणि नारायणपूर हे केवळ तीन जिल्हे अतिनक्षल प्रभावित आहेत.15ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा देखील यातून वगळण्यात आला आहे.छत्तीसगड,महाराष्ट्र झारखंड,ओडिशा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या सीमाभागात अजूनही काही प्रमाणात नक्षल्यांच्या हालचाली आहेत.परंतु केंद्र सरकारचे आक्रमक धोरण बघता लवकरच देशातून नक्षलवाद संपुष्टात येईल असे चित्र आहे.

