डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जारावंडी येथील सर्व समाजबांधवांकडून महापुरूषाला अभिवादन.
एस.के.24 तास
एटापल्ली : दि.06 डिसेंबर 2025 भारताचे संविधान निर्माता, विश्वरत्न भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मौजा,जारावंडी येथे आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजातील सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत महापुरुषाच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन करून झाली.त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटे मौन पाळण्यात आले.या प्रसंगी प्रमुख वक्त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे आजच्या परिस्थितीत महत्त्व अधोरेखित केले.
वक्त्यांनी संविधानाच्या रक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने सजग राहण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच जातीभेद, अंधश्रद्धा व असमानतेविरुद्ध लढा देत बाबासाहेबांचे स्वप्न असलेले समतामूलक राष्ट्र उभारण्यासाठी पुढील पिढीने सतत प्रयत्नशील राहण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमात विद्यार्थी,महिला मंडळे,सामाजिक कार्यकर्ते, युवावर्ग यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक सामाजिक संघटना व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.शेवटी संविधानाचे वाचन व राष्ट्रगीतातून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

