समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना महाराष्ट्र राज्याच्या मार्गदर्शनाखाली...
📍बौध्द विकास नवयुवक,यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर,मौजा मंजेगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापुरूषाला अभिवादन.
एस.के.24 तास
चामोर्शी : मंजेगाव ता.चामोर्शी.जि.गडचिरोली समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना महाराष्ट्र राज्याच्या मार्गदर्शनाखाली,बौध्द विकास नवयुवक,यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर,मौजा मंजेगाव येथे दिनांक 06 डिसेंबर 2025 रोजी ६९वा महापरिनिर्वाण दिन तसेच संकल्प दिन भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते तथा रेंज ऑफिसर आयुष प्रभाकर इटकेलवार यांनी भुमिका बजावली तर प्रमुख पाहुणे म्हणून मायाताई मोहुर्ले (महिला राज्य अध्यक्षा, समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना महाराष्ट्र राज्य) उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक मान. लक्ष्मण मोहुर्ले, सामाजिक कार्यकर्ते गडचिरोली तसेच म्हणून मार्गदर्शक मान.धर्मानंद मेश्राम सर,मान.विजय देवतळे (उपाध्यक्ष, समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना), झाडे साहेब (राऊंड ऑफिसर) यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष गंगाधरजी रामटेके तंटामुक्ती अध्यक्ष यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी प्रमोद रामटेके, संजय गोरडवार साहेब, परमेश्वर मोहुर्ले साहेब, सुरज चौधरी, विलास देठे, जयश्री रामटेके मॅडम, दिलीप मोहुर्ले साहेब, विमल मोहुर्ले, मीराबाई मोहुर्ले, शामराव रामटेके, सपना अत्राम, मंदाबई मोहुर्ले, वर्षाताई संतोष गत्तुलवार, रमेश लेकलवार, बालाजी बर्लावार, रमेश बर्लावार, गंगाधर रामटेके, विठ्ठल बोमगटिवार, मोहन बंडावार,रवी गर्तुलवार, शामराव बर्लावार, अंकित मोहुरले, अनिल दूधबळे, फिरोज रामटेके, रणजित चौधरी, रवी बावणे, अनिल रजूलवार, पुरुषोत्तम गांधारवार, बंडू गेडाम, गिरिधर आलम, रवी देठे, सूरज सोनटक्के, यांची उपस्थिती विशेषत्त्वाने होती.
या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची, कार्यांची आणि सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याची आठवण करून दिली. समाजात जागृती, एकता आणि संघटनेची गरज अधोरेखित करण्यात आली. तसेच भावी पिढीने शिक्षण, बुद्धी, संघटन आणि संघर्षाच्या मार्गाने चालण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमात पंचशील ध्वज वंदन, बौद्ध धम्माची पूजा,दीपप्रज्वलन,पुष्पांजली तसेच समाजातील नवयुवकांच्या सहभागामुळे परिसरात जागृतीचे वातावरण निर्माण झाले.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवर,कार्यकर्ते व समाज बांधवांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

