1 फेब्रुवारीला श्री.संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती साजरी होणार

1 फेब्रुवारीला श्री.संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती साजरी होणार


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : संत रविदास समाज मंडळ, ब्रह्मपुरी च्या वतीने सामाजिक ऐक्य मिळून मिसळून टिकवून ठेवणे,आनंदाने, गुन्या गोविंदाने संत रविदास महाराज यांच्या शिकवणीने पुढे पुढे जाऊन सामाजिक विकास करण्याच्या दृष्टीने , भाऊबंदकी जोपासून दिनांक ०१ फेब्रुवारी २०२६ ला संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती तलाठी कार्यालय ब्रह्मपुरी च्या पटांगणात आयोजित करून साजरी करण्यात येत आहे.


या कार्यक्रमाचे उद्घाटन नवनिर्वाचित नगराध्यक्ष योगेश मिसार हे करणार असून प्रमुख अतिथी म्हणून सतीश हुमणे नगरसेवक  रंजना पिसे नगरसेविका राहणार असून समरसतेतून एकात्म भारत या विषयावर सुनील किटकरू हे वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.कार्यक्रमात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या जयंती सोहळ्याला जास्तीत जास्त समाज बांधवांनी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संत रविदास समाज मंडळाचे अध्यक्ष यांनी केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !