भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने रस्ता रोको,चक्का जाम आंदोलन ; प्रलंबित मागण्यांची प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी. अन्यथा उपोषणाच्या माध्यमातून लढा दिला जाईल. - काँ.विनोद झोडगे यांचा कंत्राटदार आणि महसूल प्रशासनाला इशारा

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने रस्ता रोको,चक्का जाम आंदोलन ; प्रलंबित मागण्यांची प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी.


अन्यथा उपोषणाच्या माध्यमातून लढा दिला जाईल. - काँ.विनोद झोडगे यांचा कंत्राटदार आणि महसूल प्रशासनाला इशारा


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : गांगलवाडी ते व्याहाड रस्ता जलद गतीने पूर्ण करा. मेन रोडचे खड्डे त्वरित बुजवा, हायवा ट्रकने होणारी जड वाहतूक थांबली पाहिजे, मुडझा ते गांगलवाडी रस्त्यावर नियमित पाणी मारा. मेन रोडच्या उडणाऱ्या धुळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेले आहे.त्यांना नुकसान भरपाई मदत द्यावी.गांगलवाडी, मूडझा,आवळगांव येथील शालेय विद्यार्थ्यांना (ब्रह्मपुरी आगारातून) ब्रह्मपुरी ते मुडझा करिता बस फेऱ्या वाढवा या सह अन्य प्रलंबित मागण्यांना घेऊन ०१ फेब्रुवारी२०२६ दुपारी १२:०० वाजता गांगलवाडी टी पॉईंट जवळ भारतीय कम्युनिस्ट पक्ष तालुका कौन्सिल ब्रह्मपुरीच्या वतीने भव्य रस्ता रोको चक्काजाम आंदोलन करण्यात आले. 


यापूर्वीच कॉम्रेड विनोद झोडगे यांनी प्रशासनाला इशारा दिला होता. अखेर लढा यशस्वी ठरला ? प्रशासनाने रास्ता रोको आंदोलन अधिक तीव्र होऊ नये म्हणून वेळीच खबरदारी घेतली.प्रशासनातर्फे नायब तहसीलदार बोभाटे तर रोडचे कंत्राटदार मिश्रा यांनी ब्रह्मपुरी चे ठाणेदार प्रमोद बानबले यांच्या मध्यस्थीने रास्ता रोको आंदोलन शांततेत पार पडले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्थानिक पोलीस प्रशासनाने खबरदारी घेत चोक बंदोबस्त तैनात केला होता.

 

यावेळी मुख्य चक्काजाम आंदोलनासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते काँ. विनोद झोडगे , कॉ.डॉ.महेश कोपुलवार, अँड जगदीश मेश्राम यांच्या नेतृत्वात पार पडला.काॅ. विनोद झोडगे यांनी स्वतः पुढाकार घेऊन सबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी प्रलंबित मागण्या संदर्भात चर्चा केली. दिलेल्या मुदतीत मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषणाच्या माध्यमातून लढा देणार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. 


या प्रसंगी ब्रह्मपुरी च्या नायब तहसीलदार बोबाटे मॅडम,कंत्राटदार मिश्रा, ठाणेदार प्रमोद बांनबले, सहायक पोलीस निरीक्षक खडसे साहेब, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण साहेब,यांच्यासह प्रशासनातील अन्य अधिकारी उपस्थित होते.रस्ता रोको चक्काजाम आंदोलन यशस्वी करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे धनराज ठाकरे, शरद ठाकरे, उसन ठाकरे, रामकृष्ण हुलके, सचिन बदन,संजय लोणारे, बंडू उरकुडे, सुरेश नखाते, योगाजी टेंभुर्णे,अमोल मानापुरे, मुखरु झोडगे,भिवाजी ठाकरे, डाकराम सेमसकार


रामदास सालोटकर, तोंडफोडे, नकटु कोराम, सुनील भोयर, विनोद पाटील, मनोहर भरे , चरण तिवाडे, दत्तू नरुले, विजय उरकुडे, अनिल हनवते, जिजाबाई गरमळे, शकुनतला खोब्रागडे, ताराबाई ठाकरे यांच्यासह अन्य शेकडो पेक्षा जास्त शेतकरी,शेतमजूर व परिसरातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !