प्राथमिक आरोग्य केंद्र अ-हेरनवरगांव येथे सिकलसेल ऍनिमिया निर्मूलन विशेष अभियान मार्गदर्शन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : राष्ट्रीय सिकलसेल ऍनिमिया निर्मूलन मिशन अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने राज्यातील सिकलसेल मुक्तीसाठी व्यापक मोहीम हाती घेतली आहे.या अभियानांतर्गत राज्यातील प्रादुर्भाव असलेल्या २१ जिल्ह्यांमध्ये १५ जानेवारी ते ०७ फेब्रुवारी २६ या कालावधीत सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान राबविले जात आहे.
या अभियानाअंतर्गत अ-हेरनवरगांव येथील प्राथमिकआरोग्य केंद्रात या मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून आरोग्य अधिकारी डॉ.राहुल सहारे व अंडेलकर यांनी आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक ,सेविका,सामुदायिक आरोग्य अधिकारी यांना मार्गदर्शन केले.अ-हेरनवरगांव प्राथमिक आरोग्य केंद्राशी जोडलेल्या गावातील लोकांच्या घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचारी त्यांची तपासणी व सिकलसेल हा अनुवंशिक आजार असल्यामुळे तो पुढच्या पिढीत जाऊ नये यासाठी विवाहपूर्व व गर्भधारणेपूर्वी समुपदेशन करीत आहेत लोकांना पटवून देत आहेत.
वैद्यकीय अधिकारी मार्गदर्शन करीत असताना या अभियानाचे स्वरूप ० ते ४० वयोगटातील नागरिक असून त्यांची अंमलबजावणी चार टप्प्यात राबवीत असताना ..
पहिला टप्पा १५ जाने. ते २० जानेवारी .
यात जुन्या रुग्णांची माहिती घेणे तसेच ज्यांची एकदाही तपासणी झाली नाही अशा नवीन व्यक्तींची यादी तयार करणे.
दुसरा टप्पा २१ ते २६ जानेवारी.
यात ज्यांची आजपर्यंत सोलोविलीटी टेस्ट झाली नाही अशा व्यक्तींची रक्त चाचणी करणे.
तिसरा टप्पा २७ ते ०३ फेब्रु...
ज्यांची प्राथमिक चाचणी झाली आहे परंतु एच पी एल सी ही अंतिम तपासणी प्रलंबित आहे अशा व्यक्तीची निश्चित निदानासाठी तपासणी करणे.
चौथा टप्पा ०४ ते ०७ फेब्रु. २६
लग्नापूर्वी सिकल सेल ची स्थिती जाणून घेऊन सिकलसेल कुंडली जुळवणे हे या आजाराच्या निर्मूलनासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे असे यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी मार्गदर्शनात सांगितले.
या मार्गदर्शनात अ-हेरनवरगांव प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.


