महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव भोसले येथे आनंद मेळाव्याचे आयोजन
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रम्हपुरी : महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव भोसले येथे विद्यार्थ्यांच्या आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्याचे उद्घाटन श्री सुरेश दुनेदार सरपंच ग्रामपंचायत पिंपळगाव यांच्या हस्ते,श्री.ओमप्रकाश बगमारे शाळेचे मुख्याध्यापक यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख अतिथी श्री सुधीर दोनाडकर सदस्य, श्री भास्करजी लांजेवार, श्री प्रफुल भगत तथा पालक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडले. आनंद मेळाव्यात जवळपास ५० विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ विक्रीकरिता मांडले व त्याची विक्री केली.पालक व विद्यार्थी यांनी मेळाव्यात मांडलेले विविध प्रकारचे खाद्यपदार्थ घेऊन विद्यार्थ्यांना खऱ्या कमाईचा उद्देश,महत्त्व पटवून दिले.
या मेळाव्याच्या निमित्याने विद्यार्थ्यांमध्ये विविध खाद्यपदार्थाची माहिती ते बनवण्याची प्रक्रिया त्याची विक्री कशी करायची, व्यवहार कसे करायचे याबद्दल विद्यार्थ्यांना जाणीव जागृती होते असे विचार सरपंच श्री.दुनेदार यांनी व्यक्त केले.या मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.



