महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव भोसले तालुका ब्रह्मपुरी येथे करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : तालुक्यातील महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव भोसले येथे कॅरिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.मेळाव्याचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री.ओमप्रकाश बगमारे सर,प्रमुख मार्गदर्शक श्री.भाऊराव राऊत सर माजी मुख्याध्यापक कृषक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय,चौगान तर प्रमुख अतिथी रुपेश पुरी सर,श्री राजेश क-हाडे सर,श्री.मेश्राम सर तथा सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
श्री.भाऊराव राऊत सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दहावीनंतर कॅरिअर निवडतांना आपले आरोग्य,परिश्रम ,बुद्धिमत्ता यांच्या जोरावर कॅरिअर निवडावे,भविष्यात भरपूर संधी उपलब्ध आहेत परंतु आपण त्या संधीच्या दृष्टीने परिश्रम करून सक्षम बना,आताच आपले ध्येय निश्चित करून पुढील वाटचाल करावी.
दहावी नंतरच्या अनेक अभ्यासक्रमाची माहिती दिली. विद्यालयात शिकत असताना विविध कौशल्य, विविध गुण विकसित करून त्याला आपले कॅरिअर बनवा असा मोलाचा सल्ला दिला.कार्यक्रमाचे संचालन व आभार श्री.महाले सर यांनी केले.

