अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण चे उद्घाटन.
एस.के.24 तास
अहेरी : शुक्रवार दिनांक 09 जानेवारी 2026 ला महसूल भवन जिमलगट्टा येथे मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण चे उद्घाटन करण्यात आले.सदर प्रशिक्षण महिला व बाल कल्याण विभाग तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे.
सदर प्रशिक्षणाचे आयोजन एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अहेरी तथा महिला आर्थिक विकास महामंडळ गडचिरोली अंतर्गत संघर्ष लोक संचालित साधन केंद्र जिमलगट्टा यां द्वारे करण्यात आले.
सदर प्रशिक्षण हे आज पासून सुरू झाले. यात जिमलगट्टा लगतच्या एकुण ५३ मुली-महिला लाभार्थी सहभागी झाले असुन.उद्घाटन कार्यक्रमात मा.राहुल वरठे सर CDPO अहेरी, मा.आनंद गिरे सर PSI जिमलगट्टा, मा. कानतोडे सर Bank Manager GDCC Bank Jimalgatta, मा. चक्रमवार सर विस्तार अधिकारी अहेरी, मा. संगीता नक्षिणे, सचिव cmrc जिमलगट्टा, मा..अंजली दोंतुल, व्यवस्थापक त्रिवेणी संगम cmrc भामरागड, तसेच संपूर्ण जिमलगट्टा CMRC staff उपस्थित होते.
अंजली दोंतुल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, मान्यवरांनी उपस्थित लाभार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन केले. तसेच तिरूमला स्वर्णकार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

