लाहेरी मार्गावर हिणबट्टी फाट्याजवळ मालवाहू जीप अन् दुचाकीची समोरासमोर धडक ; २ तरुणांचा जागीच मृत्यू.
एस.के.24 तास
भामरागड : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे.लाहेरी मार्गावरील मेडपल्ली ते हिणबट्टी मार्गावर हिणबट्टी फाट्याजवळ मालवाहू जीप व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,भामरागड लाहेरी मार्गावरील मेडपल्ली ते हिणबट्टी मार्गावर हिणबट्टी फाट्याजवळ मालवाहू जीप व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. मृत तरुणांची नवे राजेश मुरा पुंगाटी,सन्नू गुरू गोटा अशी आहेत.
अपघातानंतर त्यांना तातडीने भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भामरागड पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अपघाताबाबतचा पुढील तपास सुरू आहे.तरुणांच्या अपघाती मृत्यूने परिसरात तणावाचे वातावरण असून त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
तीन मुलांचे छत्र हरवले
सन्नू गोटा यांच्या पश्चात पत्नी व तीन लहान मुले असा परिवार असून, त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. राजेश पुंगाटी हा अविवाहित होता.

