डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन सोहळा संपन्न.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, ब्रम्हपुरी येथे नुकताच माजी विद्यार्थी स्नेह-मिलन कार्यक्रम संपन्न झाला.सत्र २००१ ते सत्र २००३ या कालावधीत बी.ए.ला असलेल्या विद्यार्थ्यांनी स्नेह- मिलन सोहळ्याचे आयोजन केले होते.महाविद्यालयाचे प्राचार्य तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था चांदाचे सचिव डॉ.देवेश कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत...
झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या तथा माजी इतिहास विभाग प्रमुख डॉ.मिता रामटेके यांनी भूषविले होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या सदस्या तथा ब्रम्हपुरी पब्लिक स्कूलच्या प्राचार्या रिमा कांबळे, संस्थेच्या सदस्या तथा समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे विचारमंचावर उपस्थित होत्या.
या प्रसंगी महाविद्यालयाचे माजी शारिरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा.मुकेश रामटेके, समाजशास्त्र विभागाचे माजी प्राध्यापक.डॉ.आर.बी. मेश्राम,महाविद्यालयाचे माजी पर्यवेक्षक श्री.आर.के.ब्राडीया,तथा शिक्षकेतर कर्मचारी श्री. अजय देशपांडे, श्री.सुकदास येसनसुरे, श्री.डी.डी.पाटील,श्री. गोकुळजी रामटेके,श्री.ज्ञानेश्वर मेश्राम विचारमंचावर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ.देवेश कांबळे यांच्या हस्ते उपस्थित माजी प्राचार्या, प्राध्यापक तथा शिक्षतेतर कर्मचारी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी प्राचार्य डॉ. देवेश कांबळे, तथा संस्था सदस्य रिमा कांबळे व स्निग्धा कांबळे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि पंचवीस वर्षानंतर झालेल्या भेटीच्या अनुभवाना आपल्या मनोगतातून प्रस्तुत करून आपल्या उपजत असलेल्या विविध कला गुणांना प्रदर्शित केले.
या कार्यक्रमाचे संचालन तुफान अवताडे तर आभार प्रज्ञा मेश्राम यांनी मानले. पुन्हा भेटत राहू, असेच कार्यक्रम घेत राहू या असा आशावाद व्यक्त करुन या स्नेह-मिलन सोहळ्याचा समारोप करण्यात आला.

