गोंडवाना विद्यापीठाच्या कला महोत्सव स्पर्धेत ने.हि.महाविद्यालय अव्वल समूहगीत,एकलगीतात प्रथम,लघुनाटिकेत द्वितीय.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी - १४/०३/२६ गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली अंतर्गत प्राध्यापकांसाठी कला महोत्सवात विद्यापीठात ज्या स्पर्धा पार पडल्या त्यात ब्रह्मपुरीच्या नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी अव्वल स्थान प्राप्त केले आहे.यात समूहगीत स्पर्धेत डॉ असलम शेख, डॉ धनराज खानोरकर, डॉ मिलिंद पठाडे,प्रा आकाश मेश्राम यांनी ' आता उठवू सारे रान 'हे समूहगीत गाऊन प्रथम क्रमांक पटकावला.
तर एकलगीत स्पर्धेत डॉ मिलिंद पठाडे यांना प्रथम व लघुनाटिका स्पर्धेत डॉ धनराज खानोरकर यांना द्वितीय क्रमांक मिळाला.याशिवाय रस्सीखेचमध्ये डॉ असलम शेख, डॉ मिलिंद पठाडे , प्रा आकाश मेश्राम,प्रा धिरज आतला,संजू मेश्राम यांना तृतिय क्रमांक,चेस तृतिय प्रा आकाश मेश्राम तर चेस फिफ्थ डॉ असलम शेख यांनी पटकावून विद्यापीठात अव्वल स्थान प्राप्त केले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीमती स्नेहलताताई भैया, उपाध्यक्ष अँड प्रकाश भैया, सचिव अशोक भैया, सदस्य गौरव भैया,प्राचार्य डॉ सुभाष शेकोकर, समस्त प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

