श्री.अमरदीप लोखंडे यांच्या लेखणीतून... सभा खाद्यपदार्थाची...!


श्री.अमरदीप लोखंडे यांच्या लेखणीतून...

सभा खाद्यपदार्थाची...!


एस.के.24 तास 


दि.१४/०३/२६


वडा, समोसा,आलू बोंड 

बार मध्ये बसले 

इडली,डोसा,सांभारवड्याला 

ते जातांना दिसले...१

तेही त्याच ठिकाणी जाऊन 

 उभे त्यांच्या जवळ 

वडा म्हणे इडलीला 

आज कशी का सवळ...२

वैतागून ती म्हणू लागली 

दोरी घेऊन लागावे फाशी 

मरण्या अगोदर वाटले आम्हा

बारमध्ये प्यावी जराशी...३

येत वेटर म्हणे सगळ्यांना

एकाच टेबलवर सारे बसा

पेट्रोल, डिझेल, गॅस ब्रँड 

कढईत टाकून कोणतीही ढोसा...४

पेण्यासाठी मिळेल सारे 

आमलेट नाही ठुसा रसा

चिकन ,बिर्याणी, मच्छी फ्राय 

चकना खात फक्त बसा...५

का? तर म्हणे बार मधी 

गॅस हंड्याची भयंकर तूट

महायुद्धाच्या निमित्याने 

सुरू महागाईने जनतेची लूट ...६

वडापाव, मिसळ ,जिलेबी 

तेही मिळणे बंद झाले 

 मोठ्या लहान धंदे वाल्याचे

चेहरे आता कोमेजले...७

अंडा भुर्जी चायनीज फुड्स 

नोटीस विना रस्त्याच्या दूर 

राईस प्लेट,मिक्स व्हेज

धाब्यावर बंदचा सूर...८

कशी कमाल केली हो दादा

काका , मामा , तात्याने 

देशामधले वातावरण 

गरम केले गॅस हंड्याने...९

गरम केले गॅस हंड्याने...

गरम केले गॅस हंड्याने...


श्री.अमरदीप प्रल्हाद लोखंडे 

मु.पो. - अ-हेरनवरगांव /ब्रह्मपुरी 

जिल्हा - चंद्रपुर.८३०८००५८६८

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !