भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन MIDC करिता अधिग्रहित करू नये.मागणीसाठी 12 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी बचाव जनांदोलन समितीच्या वतीने धरणे व मुंडन आंदोलन. 📍काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची पत्रकार परिषदेतून माहिती.

भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन MIDC करिता अधिग्रहित करू नये.मागणीसाठी 12 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी बचाव जनांदोलन समितीच्या वतीने धरणे व मुंडन आंदोलन.


📍काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची पत्रकार परिषदेतून माहिती. 


एस.के.24 तास 


गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात जेएसडब्ल्यू प्रकल्प सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया शासनाकडून सुरू करण्यात आली आहे. या जमीन अधिग्रहणाला स्थानिक शेतकरी व नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.याच्या निषेधार्थ भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करू नयेत या प्रमुख मागणीला घेऊन शेतकरी बचाव जन आंदोलन समिती भेंडाळा परिसर यांच्या वतीने  १२ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे धरणे व मुंडन आंदोलन करण्यात येणार आहे.


या आंदोलनास गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर पाठिंबा  दिला असून प्रशासनाकडून  शेतकऱ्यांचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाल्यास आगामी काळात काँग्रेसच्या वतीने जेल भरो आंदोलन करू अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिले, त्याचप्रमाणे  काँग्रेस कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी सुद्धा मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या हक्काकरीता या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे. 


पत्रकार परिषदेला गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे सह  माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ॲड. विश्वजीत कोवासे, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, धानोरा तालुका अध्यक्ष प्रशांत कोराम, जिल्हा उपाध्यक्ष समशेरखा पठाण,नेताजी गावतुरे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, अनिल कोठारे, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसागडे, प्रभाकर वासेकर, परिवहन सेल जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले


श्रीनिवास ताडपलीवार, संजय गावडे, संजय चन्ने, हरबाजी मोरे, दिवाकर निसार, धीवरू मेश्राम, हेमंत मोहितकर, स्वप्निल बेहेरे, सौ. कल्पना नंदेश्वर,सौ.कविता उराडे, सौ. पौर्णिमा भडके, सौ. रिता गोवर्धन, सौ. मंजू आत्राम, सौ. मीनल चिमूरकर, सौ. शीतल ठवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !