मुख्याध्यापक ओमप्रकाश बगमारे यांचा सेवानिवृत्ती पर निरोप समारंभ.

मुख्याध्यापक ओमप्रकाश बगमारे यांचा सेवानिवृत्ती पर निरोप समारंभ.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित महाराष्ट्र विद्यालय, पिंपळगाव (भोसले) येथे ओमप्रकाश बगमारे जीवशास्त्र विषयाचे विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांची बदली महाराष्ट्र विद्यालय आवळगांव या ठिकाणी झाली.


 व तेथे विज्ञान शिक्षकाची धुरा सांभाळली.महाराष्ट्र विद्यालय , पिंपळगाव भोसले येथील मुख्याध्यापक कोसे हे सेवानिवृत्त झाल्यामुळे रिक्त झालेल्या पदावरती आवळगांव वरून परत ओमप्रकाश बगमारे यांची मुख्याध्यापक म्हणून वर्णी लागली आणि ते रुजू झाले.

 

त्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात पिंपळगांव, आवळगांव, पिंपळगांव हा प्रवास सर्व शाळेतील कर्मचाऱ्यारी, विद्यार्थी व गावातील नागरिकांशी मिळून मिसळून सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होऊन, संस्था,शाळेच्या हिताचे कार्य करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व शाळेचा नावलौकिक करण्यासाठी सतत धडपड केली. 


31 मार्च 2026 ला 33 वर्षाची सेवा केल्यानंतर ओमप्रकाश मुखरुजी बगमारे नियत वयोमानानुसार मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाल्यामुळे विद्यालयाच्या वतीने निरोप समारंभाचा कार्यक्रम घेऊन त्यांना भावना विवश होऊन निरोप देण्यात आला.


या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील शिक्षक पुरी सर, सचिन क-हाडे सर,महल्ले,घ्यार, नाकाडे, शिक्षिका अंशुल राऊत ,भूते शिक्षकेतर कर्मचारी अनिल महाजन गुलाब वाघाडे राम कैलास भारती विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार सडमाके यांनी व्यक्त करून पार पाडले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !