गडचिरोली तालुक्यातील वसा येथील सर्वे क्रं.४५७ मध्ये वहीवाटीच्या मार्गावर विनापर्वान्याने मुरुमाचे अवैद्य उत्खनन..!
📍तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडून उत्खननाला पाठराखण असल्याची शंका...!
एस.के.24 तास
गडचिरोली : तालुक्यापासून अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या वसा (पोर्ला) येथे गावतलावाच्या बांधावर जाण्याचा मार्ग तसेच शेताकडे आणि तलावाच्या पाळीवरुनच वसा ते पोर्ला जान्याचा वहीवाटीच्या मार्गाला अडथडा निर्माण करन्याच्या उद्देशाने हेतुपुरस्सर जेशीबि च्या सहाय्याने अवैध मुरूम उत्खनन करुन १० ते १५ फुट खोल खड्डा दिनांक १२ एप्रिल रोजी रस्त्याच्या बाजुने दिवसा करण्यात आला, तर मध्यरात्री च्या सुमारास वहीवाटीच्या रस्त्यावर खड्डा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वसा येथील सर्वे क्र. ४५७ च्या बाजुलाच वसा येथील शिवणकर परीवारांचे मेघनाथाचे मंदिर आहे.आणि त्या मंदीराच्या बाजुनेच वसा गावतलावाच्या पाळीवर आणि काही शेतकऱ्यांच्या शेताकडे तसेच खुशाल पंढरी भोयर यांनी आपल्या शेतालगत आपले मकान बांधून राहत असल्याने त्यांना व ईतर शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.
तरी सदर उत्खनन विषयी दिनांक १३ एप्रिल रोजी अवैध उत्खनन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी व मार्ग सुरळीत करुन देण्यात यावा यासाठी मा. तहसीलदार यांना अर्ज देऊन सुद्धा कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.विशेष म्हणजे उत्खनन करणाऱ्या जेशीबि व ट्रॅक्टर चालकांना खुशाल पंढरी भोयर यांनी मध्यरात्री लघुशंकेसाठी बाहेर निघाले असता खोदकाम करण्यास कोणी सांगितले म्हणून विचारले असता त्यांच्याकडून श्रीराम डोर्लीकर आणी त्यांचा मुलगा शरद डोर्लीकर यांच्या सांगण्यावरून करीत असल्याचे सांगितले.
एवढा मोठा मुरुम उत्खनन होउनही तेथील तलाठी व मंडळ अधिकारी यांनी या विषयावर आजपर्यंत कुठलीही चौकशी न करता उत्खनन करते तसेच जेशीबि व ट्रॅक्टर चालक आणि मालक यांच्यावर कुठलीही प्रशासकीय कारवाई करण्यात आली नसल्याने तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडून उत्खनन करत्यांची पाठराखण तर केली जात नाही आहे ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे जिल्हास्तरीय महसूल अधीकार्यांकडून सदर प्रकरणात दखल घेऊन योग्य चौकशी करून दोशींवर कारवाई करण्यात यावि याकरीता मा.जिल्हाधिकारी गडचिरोली यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे

