पिंपळगाव भोसले येथे शासन आपल्या दारी छत्रपती शिवाजी महाराज महसुल समाधान शिबिरात नागरीकांची कामे जागेवरच मार्गी.

पिंपळगाव भोसले येथे शासन आपल्या दारी छत्रपती शिवाजी महाराज महसुल समाधान शिबिरात नागरीकांची कामे जागेवरच मार्गी.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगांव भोसले येथील महाराष्ट्र वीद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महसुल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराला नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतीसाद मिळाला.शासनाच्या विविध सेवा थेट गाव पातळीवर उपलब्ध करुण देण्याच्या उद्देशाने हे शिबिर पार पडले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष अप्पर जिल्हाधीकारी चिते (चिमुर)तर प्रमुख अतीथी उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील,तहसीलदार सतीश मसाळ,नायब तहसीलदार बोंबाटे, एआरओ मडावी,तालुका क्रुषीअधीकारी घुले,आर आय येरणे, ग्राम महसूल अधिकारी संजय मटाले व इतर विभागातील अधीकारी वर्ग उपस्थित होते.

   

या अभीयाना अंतर्गत क्रिमीलेअर,जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला,७/१२ फेरपार,नाव कमी करणे तर काहींचे नावे. चढविणे, डोमेशियल, जातीचे प्रमाणपत्र, श्रावन बाळ, संजय गांधी निराधार, अशा अनेक विभागाच्या वतीने प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.यात कृषी ,भुमीअभीलेख, बॅंक व ईतरही कामे सहज व सुलभ कसे करता येईल यावर प्रकाश टाकण्यात आले. 


अनेक नागरीकांनी आपल्या समस्या मा़ंडलेल्या समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यात आले. या शिबीरामुळे नागरीकांना शासकीय कार्यालयाच्या पायपीटीसह शारीरीक, मानसीक,आर्थीक त्रास वाचला व पैशाची बचतही झाली. या मुळे नागरीकांनी समाधान व्यक्त करून शासनाच्या या उपक्रमाचे स्वागत केले.अशा शिबीराचे आयोजन नियमीत पणे करावे अशा भावना नागरिकांनी यावेळी व्यक्त केल्या.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !