संघटनेचा प्रथम " वन दक्षता योद्धा पुरस्कार " शहीद विजयजी शिंगणजुडे यांना मरणोत्तर जाहीर.


संघटनेचा प्रथम " वन दक्षता योद्धा पुरस्कार "  शहीद विजयजी शिंगणजुडे यांना मरणोत्तर जाहीर.


एस.के.24 तास 


नागपूर : महाराष्ट्र वन कर्मचारी-अधिकारी दक्षता सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सचिन डी. गायकवाड (भारतीय) यांच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रातील वन परिवारासाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे.कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्राची अमूल्य वनसंपदा वाचवताना आपल्या प्राणांची आहुती देणारे वीर सुपुत्र शहीद विजयजी शिंगणजुडे यांच्या अद्वितीय शौर्याला आणि बलिदानाला अभिवादन म्हणून संघटनेतर्फे त्यांना " वन दक्षता योद्धा पुरस्कार " (मरणोत्तर) जाहीर करण्यात आला आहे.


पुरस्काराचे स्वरूप आणि वितरण सोहळा : - 


पुरस्काराचे नाव : - वन दक्षता योद्धा पुरस्कार (मरणोत्तर)

सोहळा: संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन, नागपूर

दिनांक : - 21 व 22 नोव्हेंबर 2026

स्वीकारकर्ते : - शहीद विजयजी शिंगणजुडे यांचे कुटुंबीय

पुरस्कार देण्यामागील उद्देश : - 

अद्वितीय शौर्याचा गौरव : - वणव्याच्या भीषण ज्वाळांशी सामना करताना स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता कर्तव्य पार पाडल्याबद्दल.

जागृती निर्माण : - त्यांच्या बलिदानामुळे राज्यभर वन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा व हक्कांचा प्रश्न ऐरणीवर आला.

प्रेरणास्थान : - शहीद विजयजी शिंगणजुडे हे संपूर्ण वन विभागासाठी आणि संघटनेसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत.


“ विजयजी शिंगणजुडे यांचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. त्यांच्या कुटुंबाचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे. 21-22 नोव्हेंबर रोजी नागपूर येथे होणारे राज्यस्तरीय अधिवेशन केवळ मागण्यांसाठी नसून आमच्या शहीद बांधवांच्या सन्मानासाठी असेल.हा पुरस्कार प्रशासनाला दिलेला स्पष्ट संदेश आहे की, आमचा प्रत्येक " वन योद्धा "  आमच्यासाठी अनमोल आहे.” - सचिन डी.गायकवाड (भारतीय) संस्थापक अध्यक्ष मो.7058347367

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !