वनपरिक्षेत्र कार्यालय सावली येथे पाणपोईचे उद्घाटन.
एस.के.24 तास
सावली : दिनांक,5/4/2026 रोजी सावली येथे वनपरिक्षेत्र कार्यालयाचे परिसरात विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली यांचे हस्ते पाणपोईचे उद्घाटन पार पडले. " जनसेवा हीच ईश्वर सेवा " ह्या उक्तीप्रमाणे ईश्वराची सेवा करायची असेल तर मानव जातीची सेवा केली पाहिजे, त्यांच्या दुःख सुखदुःखात सहभागी झाले पाहिजे,तरच खऱ्या अर्थाने ईश्वराची सेवा केल्याचं सार्थक होईल.
या उदात्त हेतूने सावली या तालुक्याच्या मुख्यालय ग्रामीण भागातून मजूर वर्ग, शाळकरी मुले, व शेतकरी वर्ग आठवडी बाजार, दैनंदिन कामे व शासकीय कामाकरिता तालुका मुख्यालयि येत असल्याने व खेड्यातून येणारी सर्व साधारण वर्ग हा गरीब असल्याने प्रत्येक वेळी पिण्याचे पाणी घेऊन पाणी पिणे शक्य नसल्याने,सदरचे गरीब जनतेची सेवा करता यावी म्हणून राजन तलमले
विभागीय वन अधिकारी व विकास तरसे सहाय्यक वनसंरक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली आज सावली वनपरिक्षेत्र कार्यालयाचे परिसरात मोठ्या उत्साहात पानपोइचे उद्घाटन पार पडले.सदर प्रसंगी नरेश सिडाम क्षेत्र सहाय्यक,सावली,राजू मुरकुटे वनरक्षक चकपिरंजी,सतीश मजोके,बंडू दुधे, दिनेश सोनुले,रवी सोनुले,नवनीत,दिनेश मडावी यांनी मोलाचे सहकार्य केले.


