राष्ट्रसंतांनी मानवतावादी दृष्टिकोन अंगीकारला. - प्राचार्य डॉ.सुभाष शेकोकर.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती.

राष्ट्रसंतांनी मानवतावादी दृष्टिकोन अंगीकारला. - प्राचार्य डॉ.सुभाष शेकोकर.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी -३०/०४/२६ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अखिल भारतीय गुरुदेवा सेवा मंडळाची स्थापना करुन मानव व समाज उत्थानाचे कार्य केले. आपल्या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष राहिले आहेत.इथे त्यांच्या विचाराचा वारसा आहे.खंजेरी भजन माध्यमातून त्यांनी राष्ट्र व समाजजागृती केली. राष्ट्रसंतांनी सर्वसमावेशक मानवतावादी दृष्टिकोन अंगीकारला. " असे विवेचन प्राचार्य डॉ. सुभाष शेकोकरांनी केले.


ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त बोलत होते.सर्वप्रथम महाराजांच्या फोटोला प्राचार्य डॉ शेकोकर व मेजर विनोद नरड यांनी माल्यार्पण केले.डॉ धनराज खानोरकरांनी राष्ट्रसंतांचे ' हर भेष मे तू/हर देश मे तू ' हे भजन गावून अभिवादन केले.

    

यानंतर उपस्थित डॉ राजेंद्र डांगे,डॉ रेखा मेश्राम,डॉ धनराज खानोरकर,डॉ असलम शेख,डॉ मोहन कापगते, डॉ रतन मेश्राम, डॉ युवराज मेश्राम, डॉ योगेश ठावरी, डॉ भास्कर लेनगुरे, डॉ सुनिल चौधरी, डॉ प्रकाश वट्टी, डॉ पद्माकर वानखडे, डॉ किशोर नाकतोडे,अधीक्षक संगीता ठाकरे,डॉ.कुलजित शर्मा, डॉ अरविंद मुंगोले,डॉ हर्षा कानफाडे,डॉ विवेक नागभीडकर


डॉ मिलिंद पठाडे,डॉ वर्षा चंदनशिवे, डॉ राजू आदे,डॉ दर्शना उराडे,प्रा निलिमा रंगारी,प्रा बालाजी दमकोंडवार,प्रा आकाश मेश्राम, डॉ अतुल येरपुडे,प्रा जयेश हजारे,प्रा धिरज आतला, डॉ अभिमन्यू पवार,प्रा बंडू गेडाम इ.मान्यवरांनी पुष्प वाहून महाराजांना अभिवादन केले.संचालन व आभार डॉ युवराज मेश्राम तर यशस्वीतेसाठी समिती प्रभारी डॉ कुलजित शर्मा, डॉ मेश्राम, डॉ खानोरकर,प्रा आतला, जगदिश गुरनुले व प्रदीप रामटेकेंनी सहकार्य केले

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !