ब्रह्मपुरीकरांची प्रतीक्षा संपली..! " ब्रह्मपुरी-पुणे " खासगी बस सेवेचा थाटात शुभारंभ.

ब्रह्मपुरीकरांची प्रतीक्षा संपली..! " ब्रह्मपुरी-पुणे " खासगी बस सेवेचा थाटात शुभारंभ.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक.


ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी शहर आणि परिसरातील नागरिकांची गेल्या अनेक दिवसांपासूनची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली आहे. ब्रह्मपुरी ते पुणे या थेट बस सेवेचा १० एप्रिल रोजी भव्य शुभारंभ करण्यात आला. या नवीन बस सेवेमुळे पुण्याला शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.

          

काँग्रेस तालुका अध्यक्ष खेमराज तिडके यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमात माजी आमदार अतुल देशकर यांच्या हस्ते बसला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष योगेश मिसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देवीदासजी जगनाडे सर, इकबाल जेसानी, पत्रकार विजय मुळे, संजय लांबे, प्रज्वल बालपांडे, नंदू गुड्डेवार, महेश पिलारे यांसह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     

ही बस सेवा प्रवाशांच्या सोयीसाठी अत्यंत सोयीस्कर अशा मार्गाने धावणार आहे.ब्रह्मपुरी – उमरेड – हिंगणघाट – वर्धा – औरंगाबाद – अहिल्यानगर (अहमदनगर) – पुणे ह्या मार्गाने बस दररोज दुपारी ४:०० वाजता ब्रह्मपुरी येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८:०० वाजता पुण्यात पोहोचेल.


ब्रह्मपुरी भागातील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी पुण्याला जातात. रेल्वेचे आरक्षण मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि थेट प्रवासाची वानवा लक्षात घेता, ही बस सेवा सुरू होणे अत्यंत गरजेचे होते. ब्रह्मपुरी येथील एकविरा ट्रॅव्हल्सचे संचालक नंदू गुड्डेवार यांनी पुढाकार घेऊन उमरेड येथील साई ट्रॅव्हल्स कंपनीशी संपर्क साधला.


आणि ही बस सेवा सुरू करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. या नवीन बस सेवेमुळे ब्रह्मपुरीच्या दळणवळण सुविधेत मोठी भर पडली असून, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पहिल्याच दिवशी प्रवाशांचा मोठा प्रतिसाद या बस सेवेला लाभला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !