ब्रह्मपुरी येथील सेवानिवृत्त शिक्षक चरणदासजी डांगे यांचे निधन. 📍सामाजिक कार्यकर्ते प्रशांत व अ‍ॅड.राजेश डांगे यांचे पितृछत्र हरपले.

ब्रह्मपुरी येथील सेवानिवृत्त शिक्षक चरणदासजी डांगे यांचे निधन.


📍सामाजिक कार्यकर्ते प्रशांत व अ‍ॅड.राजेश डांगे यांचे पितृछत्र हरपले.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक 


ब्रह्मपुरी - २७/०५/२६ स्थानिक टिळक नगर येथील रहिवासी, डॉ. आंबेडकर विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक चरणदासजी मंगरू डांगे (वय ८० वर्ष) यांचे आज सकाळी ८ : ०० वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने डांगे परिवारावर शोककळा पसरली असून ब्रह्मपुरी परिसरातील एका आदरणीय शिक्षकाला व मार्गदर्शकाला समाज मुकला आहे.

चरणदासजी डांगे यांनी डॉ. आंबेडकर विद्यालय, ब्रह्मपुरी येथे दीर्घकाळ शिक्षक म्हणून अविरत सेवा दिली.आपल्या अध्यापन कौशल्याने आणि सुस्वभावाने त्यांनी अनेक पिढ्या घडवल्या. लोक कल्याणासाठी सदैव धावून येणारे ब्रह्मपुरीतील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रशांत डांगे आणि अ‍ॅडव्होकेट राजेश डांगे यांचे ते वडील.त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सून, नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.

स्व.चरणदासजी डांगे यांच्या पार्थिवावर उद्या गुरुवार २८ मे २०२६ रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार असून सकाळी ९- ०० ते १०:०० वाजताच्या दरम्यान त्यांची अंत्ययात्रा टिळक नगर ब्रह्मपुरी राहते घरून काढण्यात येणार असून भूती नाल्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या निधनाबद्दल ब्रह्मपुरीतील शैक्षणिक,सामाजिक आणि विधी क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त करत डांगे परिवाराप्रती संवेदना प्रकट केल्या आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !