महाराष्ट्र विद्यालय,पिंपळगाव (भोसले) यांनी उत्कृष्ट निकाल देण्याची परंपरा कायम राखली.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : काल घोषित झालेल्या नागपूर बोर्डाच्या एसएससी मार्च - २६ च्या निकालात ब्रह्मपुरी तालुक्यातील महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ पिंपळगाव भोसले द्वारा संचालित महाराष्ट्र विद्यालयाने शाळेचा उत्कृष्ट निकाल देण्याची परंपरा कायम राखून यावर्षीही उत्कृष्ट ८० विद्यार्थ्यांपैकी ७५ पास झाल्यामुळे शाळेचा ९३ टक्के निकाल लावला.
या निकालात सुरज कामडी - ८९.२०% गुण प्राप्त करून विद्यालयातून पहिला
कु.हिमानी मिसार -८८.४० टक्के गुण प्राप्त करून दुसरी तर
कु.हसीना ठाकरे - ८४.४० टक्के गुण प्राप्त करून तिसरी ठरली.
गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक, जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्तेने पास होण्यासाठी शाळेच्या पहिल्या दिवसापासून तर परीक्षेच्या कालावधीपर्यंत धडपड करणारे शिक्षक सचिन क-हाडे, महल्ले, पुरी, घ्यार, सडमाके व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व कौतुक करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
पिंपळगाव वाशीय प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थ्यांचे पालक, गावकऱ्यांनी शाळेने उत्कृष्ट निकाल लावल्याबद्दल शाळेचे अभिनंदन केले.

