ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पती - पत्नी जागीच ठार ; एक तरुण गंभीर जखमी.

ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पती - पत्नी जागीच ठार ; एक तरुण गंभीर जखमी.


एस.के.24 तास 


अहेरी : भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास अहेरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तलवाडा गावाजवळ घडला.या घटनेनंतर वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. असून,अहेरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,भामरागड तालुक्यातील महाकापडी येथील रहिवासी मिडको कुम्मा पुंगाटी (४८) आणि कुम्मा महारू पुंगाटी हे दोघे आपल्या दुचाकीने प्रवास करत होते.

चंदू महाका (१७, रा. परायणार ) हा तरुण गावाकडे जाण्यासाठी तलवाडा येथून त्यांच्या दुचाकीवर बसला होता. तलवाडापासून तीन किमी अंतरावर असताना ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील तिघेही लांब फेकले गेले.

घटनेची माहिती मिळताच टायगर ग्रुपचे साई तुलसीगिरी आणि रुग्णवाहिका चालक समीर सलाम शेख यांनी तत्परता दाखवत रुग्णवाहिकेसह घटनास्थळ गाठले आणि तिन्ही जखमींना तात्काळ अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र, रुग्णालयात तपासणी अंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मिडको पुंगाटी आणि कुम्मा पुंगाटी यांना मृत घोषित केले. 

या अपघातात आशिष महाका याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अपघातानंतर त्या परिसरात प्रचंड वादळ आणि पाऊस सुरू झाल्याने जखमींना उपचारासाठी घेऊन जाताना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागला.

याप्रकरणी समीर शेख यांच्या तक्रारीवरून अहेरी पोलिसांनी वाहन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०६(१), २८१, १२५(ब) सह मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 


अहेरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनेश येवले या प्रकरणाचा पुढील तपास करत असून फरार वाहन चालकाचा शोध घेतला जात आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !