पोस्टे आष्टी पोलीसांनी केला अवैध डिझेल व चारचाकी वाहनासह एकूण 7,58,780/- रुपयांचा मुद्देमाल जप्त.


पोस्टे आष्टी पोलीसांनी केला अवैध डिझेल व चारचाकी वाहनासह एकूण 7,58,780/- रुपयांचा मुद्देमाल जप्त.


एस.के.24 तास 


चामोर्शी : (दिनांक,01/06/2026 सोमवार)गडचिरोली जिल्हयात अवैधरीत्या छुप्या रीतीने डिझेल व पेट्रोल विक्री व वाहतुक करण्याचा प्रयत्न केला जात असून त्याविरुध्द पोलीस अधीक्षक श्री.एम.रमेश यांनी अवैध डिझेल व पेट्रोल विक्री व वाहतूक करणा­यांवर प्रभावीपणे कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत.यावरुन काल दिनांक,31 मे 2026 रोजी पोस्टे आष्टी येथील पोलीस पथकाने अवैद्य डिझेलची वाहतूक करणा­या आरोपीविरुध्द कारवाई केलेली आहे.

सविस्तर वृत असे आहे की, काल दिनांक,31 मे 2026 रोजी पोस्टे आष्टी येथील अधिकारी व अंमलदार यांना पेट्रोलिंग करीत असताना पेट्रोलिंग दरम्यान पोलीस पथकास एक विना क्रमांकाचे संशयीत ट्रॅक्टर वाहन ज्यावर काही ड्रम वाहून नेले जात होते, हे गांधीनगर येथून आनंदग्राम कडून मुलचेराच्या दिशेने येताना दिसून आले.पोलीस पथकाने सदरचे वाहन थांबवून वाहन चालकाचे नाव विचारले.  

नाव किशोर विश्वजीत बिश्वास रा.देवजगर पो.खुदीरामपल्ली ता.मुलचेरा जि.गडचिरोली असे सांगितले.त्यानंतर पोलीस पथकाने सदर चारचाकी वाहनाची तपासणी केली असता, वाहनामध्ये 1) 02 लोखंडी ड्रममध्ये प्रति ड्रम 200 लिटर याप्रमाणे 400 लिटर डिझेल, याप्रमाणे एकूण 39,720/- रुपये किंमतीचे डिझेल, 2) 05 निळ्या रंगाच्या प्लॅस्टक बॅरेलमध्ये एकूण 1199 लिटर डिझेल, याप्रमाणे एकूण 1,19,060/- रुपये किंमतीचा अवैध डिझेल साठा मिळून आला. 

सदर डिझेल वाहतूकीबाबत किशोर बिश्वास याच्याकडे अधिक विचारपूस केले असता डिझेल वाहतूक संबंधाने कोणत्याही प्रकारचा वाहतूक परवाना किंवा संबंधीत विभागाची परवानगी नसल्याचे दिसून आले. यावरून आष्टी पोलीसांकडून सदर डिझेल साठयासह अवैद्य डिझेल वाहतूक करीता वापरण्यात आलेली 

जॉन डीअर कंपनीचे ट्रॅक्टर व ट्रॉली विना नंबरची जुनी वापरती अंदाजे किंमत 6,00,000/- रुपये असा एकूण 7,58,780/- (सात लाख अठ्ठावन्न हजार सातशे एैंशी रुपये) रुपयाचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला.

संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे आष्टी येथे दिलेल्या तक्रारीवरुन कलम 3, 7 जीवनावश्यक वस्तु कायदा 1955 अन्वये आरोपी नामे 1) किशोर विश्वजीत बिश्वास रा.देवजगर पो.खुदीरामपल्ली, ता.मुलचेरा जि. गडचिरोली यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी यास अटक करण्यात आली आहे.सदर गुन्ह्राचा पुढील तपास पोस्टे आष्टी चे पोनि.श्री.विशाल काळे हे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. एम.रमेश,अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधिरा,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी.अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. हर्षवर्धन बी.जे.प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी 

श्री.अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे आष्टीचे प्रभारी अधिकारी पोनि. श्री. विशाल काळे यांच्या नेतृत्वात पोस्टे आष्टीचे पोउपनि. गोकुलदास मेश्राम व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !