आता हे काय हद्दच झाली,आता कंत्राटी पद्धतीने तहसीलदार पद भरणे आहे.
★ ‘ या ’ जिल्ह्याने काढली जाहिरात.
एस.के.24 तास
जळगाव : जिल्हाधिकारी जळगाव,सक्षम प्राधिकारी जळगाव,उप विभागीय अधिकारी भूसावळ, अमळनेर,पाचोरा, चाळीसगाव आदी भागांमध्ये सहा महिन्यांकरीता सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची विविध पदांवर पदभरती केली जाणार आहे. याची जाहिरात समाज माध्यमांवर फिरत असून यानुसार आता सहा महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने तहसीलदार पदावर भरती केली जाणार आहे.