नेरी येथे गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्राम जयंतीच्या उत्सवाची सांगता.
एस.के.24 तास
चिमुर : मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मदिवस 30 एप्रिल म्हणून श्री गुरुदेव सेवा मंडळ नेरीच्या वतीने राष्ट्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ग्राम जयंती उत्सवाची सांगता आज करण्यात आली.
त्यानिमित्ताने सकाळी 5 वाजता सामुदायिक ध्यान त्या नंतर ग्राम सपाई करण्यात आली.त्यानंतर वार्डामध्ये रामधून पालकीचे स्वागत महाराजांचा जय घोष करीत मार्गक्रमण करीत मंदिरात आली त्या नंतर महाराजांचे भजन आणि प्रसाद वाटप करण्यात आला.
त्या नंतर सायंकाळी 6 वाजता प्रार्थने चे आयोजन करण्यात आलेले , आणि या प्रार्थनेच्या म्हत्वावर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा प्रचार प्रसार व्हावा गावात जण जागृती व्हावी याकरिता मान्यवरांचे प्रार्थनेचे महत्त्वा वर मार्गदर्शन ग्रामजयंती निमित्य करण्यात आले आणि शेवठी राष्ट्रवदना आणि महाप्रसाद या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाकरिता सर्वमंडळाचे कार्यकर्ते यांनी पद्धधिकारी यांनी सहकार्य केले.