आलापल्लीत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या पडीक क्वॅार्टरलाच प्रतिबंधीत सुगंधी तंबाखूचा अड्डा बनविल्याचा प्रकार उघडकीस.
एस.के.24 तास
अहेरी : आलापल्लीत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या पडीक क्वॅार्टरलाच प्रतिबंधीत सुगंधी तंबाखूचा अड्डा बनविल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. अहेरी पोलिसांच्या छाप्यात हा प्रकार उघडकीस आला. या कारवाईत 7 लाख 55 हजार रुपयांचा सुगंधीत तंबाखू जप्त करण्यात आला. आरोपी रुणाल झोरे वय,33 वर्ष रा.सावरकर चौक, आलापल्ली याचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी झोरे याच्या घराच्या बाजुलाच वनविभागाचे पोलीस क्वॅार्टर आहे. ते सध्या सुस्थितीत नसल्याने तिथे कोणी राहात नव्हते. याचा गैरफायदा घेत आरोपी झोरे याने त्या सरकारी जागेलाच आपला अड्डा बनवत तिथे सुगंधीत तंबाखू साठवून ठेवला होता. यासंदर्भात अहेरी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मध्यरात्री त्या ठिकाणी छापा मारला.आ
आरोपी झोरे याने त्या क्वॅार्टरमध्ये ठेवलेले मजा 108 हुक्का शिशा तम्बाखू असे लिहिलेले 200 ग्रॅम वजनाचे 40 डब्बे एका चुंगळीत बसतील याप्रमाणे एकूण 18 चुंगळ्या (720 डबे) जप्त केल्या. हा मालाची किंमत 6 लाख 73 हजार 200 रुपये आहे.
याशिवाय एका पिवळ्या रंगाच्या चुंगळीमध्ये होला हुक्का शिशा तंम्बाकु असे लिहीलेले एक किलो वजनाचे 10 पाऊच याप्रमाणे एकुण 2 चुंगळ्यांमध्ये 20 पाऊच (विक्री किंमत 820 रू. प्रतिपाऊच) प्रमाणे एकूण 16,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तसेच एका पांढऱ्या रंगाच्या चुंगळीमध्ये ईगल हुक्का शिशा तम्बाकु असे लिहीलेले 1 किलो वजनाचे 8 पाऊच (प्रतिपाऊच विक्री किंमत 1550 रूपयेप्रमाणे) असा एकूण 12,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
एवढेच नाही तर दोन खाकी रंगाच्या बॉक्समध्ये सिग्नेचर फिनेस्ट पान मसाला असे लिहिलेले एकूण 98 बॅाक्स (वजन 216 ग्रॅम) प्रतिबॉक्स विक्री किंमत 820 प्रमाणे एकुण 52,920 रुपयांचा मुद्देमाल, असा सर्व प्रकारचा सुगंधीत तंबाखू मिळून 7 लाख 54 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
ही कारवाई अहेरीचे पोलीस निरीक्षक स्वप्निल ईज्जेपवार यांच्या मार्गदर्शनात हवालदार वंदना डोनारकर यांनी केली. अधिक तपास सहायक पो.निरीक्षक पटले करीत आहेत.