ने.हि.विद्यालय,ब्रम्हपुरी चे सुयश.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी - १३/०५/२५ नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्था, ब्रम्हपुरी द्वारा संचालित ने.हि. विद्यालय ब्रम्हपुरीचा इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल 88.29 % लागला असून विद्यालयाने ब्रम्हपुरी तालुक्यातून उत्कृष्ट निकाल देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
ने.हि. विद्यालय ,ब्रम्हपुरी येथून हर्षल होमराज पगाडे हा विद्यार्थी 94.20% गुण प्राप्त करून विद्यालयातून प्रथम आला आहे. हर्षल मोरेश्वर विखार आणि साहिल सतिश राऊत हे दोन विद्यार्थी 90% गुण घेऊन द्वितीय, कृनाल प्रदीप सूर्यवंशी 89.80% घेऊन तृतीय आला आहे.तसेच अमन मनोहर नागोसे हा विद्यार्थी 89.60% सह चतुर्थ,प्रेम कृष्णा ठिकरे हा 86.40% सह पाचवा आला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव अशोकजी भैया साहेब तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी,प्राचार्य के.एम.नाईक,उपप्राचार्य ए.डब्ल्यू. नाकाडे, पर्यवेक्षक प्रा. प्रकाश जिभकाटे तथा सर्व शिक्षकवृंद व प्रशासकीय कर्मचारीवृंद यांनी अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.