तुकारामदादांच्या कार्यात सिंहाचा वाटा देणारे विठ्ठलराव पंचभाई गुरूदेव चरणी ब्रम्हलिन.
पुंडलिक गुरनुले - प्रतिनिधी
पवणी : विठ्ठलराव पंचभाई एक उद्योगी परीवारातील पण राहणीमान साध.श्रीमंतीचा बडेजाव त्यांच्या जगण्यात नव्हता.त्यांची निसीम निष्ठा तुकारामदादा गीताचार्य यांच्या कार्यावर होती.तन,मन,धनाने विठ्ठलराव अड्याळ टेकडीच्या कार्यात समरपीत होते.लक्ष्मणदादा नारखेडे यांच्या नंतरच जेष्ठत्व त्यांच्याकडे होते.
आज अड्याटेकडीच भूवैकुंठ यावर अखील भारतीयांच कबजा, ज्यांनी श्रमदानात घाम गाडला नाही. अशा निकष्ठीच्या हाती. पाप-पुण्यावर तत्वज्ञान सांगणाऱ्यांची चीड विठ्ठलरावांना होती.अखिल भारतीय मध्ये खोटे बोलणारे सत्तेचे लालची संख्या जास्त आहे. विठ्ठलरावांना फीतुरांचा राग होता. " कष्टा करीता कोणीही मरो।प्रतिष्ठेसाठी आम्हीच उरो । " या स्वार्थी लोकांनी तुकारामदादा, नारखेडेदादा यांचा माणसीक छळ केला होता. हे सार पंचभाई मोठ्या त्वेषाने सांगायचे. 13 मे 2025 ला विठ्ठलराव पंचभाई गुरूदेव चरणी ब्रम्हलीन झाले. त्यांच्या येनोळा (पवणी) जि.भंडारा दुपारी 3 वा अंत्यसंस्कार होणार आहेत.
आज अड्याळ टेकडी आणि तुकाराम दादांनी उभी केलेली चळवळ पोरकी झाली. प्रेमाची सहकार्याची साथ थांबली.विठ्ठलराव पंचभाई दादा आज गुरूदेव चरणी देहाने समर्पीत झाले. त्यांच्या स्मृतींना त्रिवार जयगुरू !
ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक - प्रवर्तक श्रीगुरूदेव युवामंच. मो.नं.9823966282