महाराष्ट्र विद्यालय,पिंपळगाव (भोसले) शाळेने उत्कृष्ट निकाल देण्याची कायम राखली परंपरा.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : १५/०५/२५ माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु. २०२५ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ पिंपळगाव (भोसले) द्वारा संचालित महाराष्ट्र विद्यालय, पिंपळगाव (भोसले) ता.ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर शाळेचा निकाल ८६% लागला असुन विद्यालयातून एकूण ८१ विद्यार्थी परीक्षेला बसले त्या पैकी ०८ विद्यार्थी प्राविण्यश्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. सर्व प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शाळेच्या पटांगणात पार पडला.
विद्यालयातून कुमारी उन्नती अशोक नंदेश्वर ८३.८०% गुण मिळवून प्रथम आली.तर कुमारी मुस्कान जयेंद्र गोन्नाडे ८३.४०% टक्के गुण मिळवून द्वितीय,कुमारी मानसी दिगांबर बनकर व मानसी दिलीप सेलोकर ८२% टक्के गुण मिळवून तृतीय आल्या.
सर्व प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे संस्था व शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री ओमप्रकाश बगमारे सर यांचे हस्ते श्री घ्यार सर श्री सडमाके सर श्री गावडकर सर अंशुल राऊत मॅडम इतर सर्व शिक्षक वृंद यांचे उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यशस्वी विद्यार्थ्यांना पालक व विद्यार्थ्यांच्या वतीने भविष्यातील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.