रमाबाई आंबेडकर विद्यालयाचा तन्मय वाळके तालुक्यातून प्रथम.
एस.के.24 तास
सावली : 13 मे - आज जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात रमाबाई आंबेडकर विद्यालयाने आपली उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली असून विद्यालयाचा विद्यार्थी तन्मय किशोर वाळके याने 92.60% गुण मिळवून सावली तालुक्यातून प्रथम येण्याचा बहूमान पटकावला आहे.
विद्यालयातून एकुण 158 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 151 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा एकुण निकाल 96.17% इतका असून 40 विद्यार्थी प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. 44 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 51 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 16 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
सर्व गुणवंत व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थाध्यक्ष सौ. चंदाताई सुभाष गेडाम , संस्थासचिव श्री. ए. एम. गडकरी , सर्व संचालक तथा मुख्याध्यापक श्री. एन. एल. शेंडे यांनी केले आहे.