माउंट कॉन्व्हेन्ट अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मूल चा १० वी परीक्षेचा निकाल शंभर टक्के.
एस.के.24 तास
मुल : महाराष्ट्र,मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १० वी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही माउंट कॉन्व्हेन्ट अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मूल चा निकाल शंभर टक्के लागला आहे.यंदा १० वीच्या परीक्षेला शाळेतील एकूण ३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली व त्यात सर्वजण उत्तीर्ण झाले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्रशासन आणि शिक्षक मंडळींकडून अभिनंदन करण्यात आले आहे.या यशस्वी यादीत शाळेची विद्यार्थिनी कु.किमया किरण खोब्रागडे हिने ९५.६० % गुण मिळवून तालुक्यातून व शाळेतून प्रथम क्रमांक मिळवला.
कु.अदिती किशोर भोयर हिने ९२.२००% गुण मिळवून द्वितीय क्रमांक, तर गौरी मिलिंद गोंडरलवार हिने ९०.६०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष भाऊराव झाडे, मुख्याध्यापिका रिमा कांबळे वर्गशिक्षक अशपाक सय्यद , ज्युनिअर कॉलेज प्रतिनिधी दुष्यंत गणवीर , विषय शिक्षक शिक्षिका इतर शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.