10 वी च्या परीक्षेत श्री.गुरुदेव हायस्कूल जिबगाव चा उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.

10 वी च्या परीक्षेत श्री.गुरुदेव हायस्कूल जिबगाव चा उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.


एस.के.24 तास 


सावली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक मंडळ पुणे द्वारा घेण्यात आलेल्या माध्यमिक विभाग नागपूर दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला.वंदनीय  तुकडोजी महाराज शिक्षण प्रसारक संस्था व्याहाळ खुर्द द्वारा संचालित श्री.गुरुदेव हायस्कूल जिबगाव या शाळेने वर्ग दहावीच्या निकालाची परंपरा या वर्षी सुद्धा कायम ठेवली आहे. 


या शाळेचा एकूण शेकडा निकाल 97.56% लागला असून बोर्डाच्या परीक्षेत विद्यालयातून प्रथम मंजित मुखरू गेडाम 85..80%, द्वितीय कु कल्याणी अनिल पोटे 73%तर तिसऱ्या क्रमांकावर कु. चेतना ओमदास चुदरी 71.40%% यांनी पटकावीला आहे.


विद्यालयातून एकूण 41 विद्यार्थी बसलेले होते.पैकी 40 विद्यार्थी उत्तीर्ण झाले गुणवंत विध्यार्थ्याचे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण प्रसारक संस्था पदाधिकारी तथा शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी उतीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !