वनपरिक्षेत्र दक्षिण धानोरा अंतर्गत येणाऱ्या येरपुंडी नियतक्षेत्र येनगांव येथे तीन आरोपीना अटक. 📍नायलॉन पिशवीत जिवंत घोरपड व धामण प्रजातीचा मृत अवस्थेत साप जप्त.

वनपरिक्षेत्र दक्षिण धानोरा अंतर्गत येणाऱ्या येरपुंडी नियतक्षेत्र येनगांव येथे ; तीन आरोपीना अटक.


📍नायलॉन पिशवीत जिवंत घोरपड व धामण प्रजातीचा मृत अवस्थेत साप जप्त.


एस.के.24 तास


धानोरा : दिनांक, 29/05/2025 रोजी एस. डी.पुरमशेट्टेवार वनपरिक्षेत्र अधिकारी दक्षिण धानोरा,ए. पि.कड्यम,वनरक्षक येणगांव,व्हि.आर.कुमोटी, वनरक्षक मुंगनेर व आय.जे. मडावी,वनरक्षक दक्षिण येरपुंडी हे नियतक्षेत्र येनगांव येथील कक्ष क्रं.486 मध्ये जंगल गस्त करीत असतांना 


आरोपी,श्री.मधुकर दाऊ गावडे,रा.चव्हेला,श्री.सुमित दौलत गावडे,रा.चव्हेला व श्री.रामदास गनचु दु‌गा. रा.गोट्याकनार ता.औधी जि.मानपुर मोहला चौकी राज्य,छत्तीसगड सदर कक्षात चव्हेला व मुंगनेर या रोडच्या बाजुला वारुळामध्ये आग लावून बसून होते.


घटणास्थळाच्या सभोवताल वनअधिकाऱ्यांनी पाहणी केली असता नायलॉन पिशवी मध्ये एक जिवंत घोरपड आढळून आली. व बाजुन धामन प्रजातीचा एका सापाला मारलेले आढळले. त्यांनतर मोका स्थळी जाऊन मोका पंचनामा नोंदवुन वनगुन्हा नोंदविण्यात आला.


सदर आरोपी विरुध्द भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26(1) (b) (d) व वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 (सुधारीत 2023) चे कलम 9,49 B,50,51 अन्वये कार्यवाही करण्यात आली. 


नागरीकांना आवाहन करण्यात येते की, वन्यप्राण्याची शिकार करण्यात येऊ नये.व शिकाऱ्यांची माहिती वनविभागास देण्यात यावी.


पुढील चौकशी मा.मिलीश दत्त शर्मा,उपवनसंरक्षक, गडचिरोली वनविभाग,व मा.पी.डी.पाटील, सहाय्यक वनसंरक्षक (जकास) गडचिरोली वनविभाग, गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली एस.डी.पुरमशेट्टेवार,वनपरिक्षेत्र अधिकारी दक्षिण धानोरा व त्यांचे अधिनिस्त क्षेत्र सहाय्यक नरुले,सुरेश डंकरवार,गांगरेडीवार ,निमसरकार  व वनरक्षक पुढील चौकशी कर्मचारी करीत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !